पाडळकर कॉलनीतील ओपन जिम दुर्लक्षित

पाडळकर कॉलनीतील ओपन जिम दुर्लक्षित

00917

पाडळकर कॉलनीत ओपन जिम दुर्लक्षित
साधनांची मोडतोड; दुरुस्तीची नागरिकांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

कसबा बावडा, ता. १० ः एक वर्षापासून पूर्वेकडील पाडळकर कॉलनीत ओपन जिम दुर्लक्षित आहे. २०२१ मध्ये तत्कालीन शिवसेना खासदार फंडातून ओपन जिमची बांधणी करण्यात आली. काही वर्षे ही जिम सुरू होती. परंतु सध्या येथे गवत वाढले असून दुर्लक्षित आहे. जिमच्या काही साधनांची मोडतोडही झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने दुरुस्ती करावी; अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
परिसरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, व्यायाम करता यावा म्हणून जिम सुरू करण्यात आली. परंतु ती काही काळच सुरू राहिली. सध्या तिथे गवत वाढले असून उपकरणांची मोडतोड झाली आहे. तसेच मातीचे ढीगही पडले आहेत. मोडतोड झालेली पार्ट दुरुस्तीसाठी कुणीतरी येईल त्यावेळी द्यायचे, म्हणून नागरिकांनी जपून ठेवले आहेत. यासंदर्भात रहिवाशांनी महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र अद्याप कोणतीही तोडगा निघालेला नाही. काही दिवसांपूर्वी येथील नागरिकांनी स्वतः वर्गणी काढून येथे बसण्यासाठी बाकड्यांची सुविधा केली आहे. सध्या उन्हाळ्याचे आणि सुट्ट्यांचे दिवस आहेत. त्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले खेळण्यांसाठी, फिरण्यासाठी बाहेर पडतात. येथे गवत असल्याने जिमचा वापर होत नाही. काही ज्येष्ठ महिला आणि पुरुष एकत्र मिळून गवत काढत स्वच्छता करतात. ही जिम पुन्हा सुरू व्हावी. जेणेकरून आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

कोट :
ओपन जिम सुरू झाल्यास दोन-तीन कॉलन्यांतील नागरिकांना फायदा होईल. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना व्यायामाची सवय लागेल. त्यामुळे जिम लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने पाठपुरावा व्हावा.
- दीपक पाटील, पाडळकर कॉलनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com