विद्यार्थ्यांनी खेळातून भारताचे नेतृत्व करावं - डॉ. सुनील गायकवाड

विद्यार्थ्यांनी खेळातून भारताचे नेतृत्व करावं -  डॉ. सुनील गायकवाड
Published on

1274
कसबा बावडा ः येथील राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये क्रीडा महोत्सवावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा शपथ घेतली.
........
राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये
क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा :
कसबा बावडा, ता. ३ ः महापालिका प्राथमिक शिक्षण समितीअंतर्गत राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आकाशवाणी कोल्हापूर रेडिओ केंद्राचे प्रमुख संचालक डॉ. अजितकुमार पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्‍घाटन झाले.
यावेळी उत्तम पाटील यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली. त्यानंतर क्रीडा मशाल दौड घेण्यात आली. यावेळी जालिंदर घेवडे, चंद्रकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगले, शरद पाटील, नवनाथ चौगले, दिगंबर दळवी, अभिजित जाधव प्रमुख उपस्थित होते.
क्रीडा महोत्सवात ९ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कबड्डी, लंगडी, पोटॅटो रेस, लिंबू चमचा या खेळांचे आयोजन केले. महोत्सवासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार, मिनाज मुल्ला, आसमा तांबोळी, विद्या पाटील, दीपाली यादव, बालवाडीच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सावित्री काळे व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार, कांचन हुलस्वार, संध्या दाभाडे, अमृता कांबळे व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. उत्तम पाटील व हेमंतकुमार पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले. कल्पना पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com