बावड्यातील व्यायामशाळेला लोकवर्गणीचा हातभार

बावड्यातील व्यायामशाळेला लोकवर्गणीचा हातभार
Published on

01320

लोकवर्गणीचा व्‍यायामशाळेला ‘हातभार’

सकाळ वृत्तसेवा :

कसबा बावडा : ता. ६ ः ‘कसबा बावड्यातील पॅव्हेलियन मैदानावर महापालिकेची भव्य व्यायामशाळा आहे. परंतु अनेक दिवसांपासून व्यायाम शाळेला दुरुस्तीची गरज होती. यासंदर्भात व्यायामपटूंनी महापालिकेच्या पायऱ्या झिजवल्या; मात्र फायदा झाला नाही. व्यायामाची गरज लक्षात घेऊन अखेर लोकवर्गणीतून व्यायामपटूंनीच आदर्श व्यायाम शाळा बनवली आहे.
कित्येक दिवसांपासून पॅव्हेलियन मैदानावरील महापालिकेची व्यायाम शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. व्यायाम शाळेतील रंग खराब झाला होता. व्यायामाचे साहित्य, कोचिंगसाठी लागणारे महत्त्वाचे साहित्य खराब झाले होते. एकंदरीत व्यायामशाळेची मोठी दुरवस्था झाली होती. हे लक्षात घेऊन व्यायाम करणाऱ्या तरुणांनीच लोकवर्गणीतून व्यायाम शाळा दुरुस्त करण्याचे ठरवले आणि आदर्श व्यायाम शाळा बनवली. व्यायामपटूंनीच एकत्र येऊन साहित्याच्या डागडुजीसह रंगकाम करण्यासाठी मदत केली आहे. तरुणांना प्रतिसाद म्हणून माजी नगरसेवक अजित पोवार धामोडकर, ॲड. नीलेश नरुटे, बांधकाम व्यावसायिक तानाजी पिंगळे यांनी सहकार्य केले. व्यायाम शाळेतील ट्रेनर राजू कवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे अनेक व्यायामपटू सराव करतात. यापैकी अनेकांनी शरीरसौष्ठव स्पर्धेत जिल्हा पातळीवर बक्षिसे जिंकली आहेत. दर पंधरा दिवसांतून व्यायामशाळेत येणारे तरुण परिसर स्वच्छ करतात.

कोट :
व्यायाम शाळेतील फरशी खराब झाल्याने व्यायाम करताना त्रास होतो. त्यामुळे येथे मॅटिंगची आणि ॲडव्हान्स मशिनरींची गरज आहे. महापालिका फंडातून किंवा नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींकडून नवीन मॅटिंगसाठी सहकार्य मिळावे.
- प्रशांत केंबळे, व्यायामपटू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com