बावड्यात महाशिवरात्री उत्सवात साजरी

बावड्यात महाशिवरात्री उत्सवात साजरी
Published on

कसबा बावड्याला मिरवणूक
कसबा बावडा ः रणदिवे गल्लीतील महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव थाटात झाला. सकाळी सहाला ॲड. नीलेश नरुटे यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीस एकत्रित अभिषेक करण्यात आला. पुजारी जगन्नाथ रेडकर यांनी बेल-फुलांच्या सुंदर सजावटीत ''श्रीं''च्या मूर्तीची पूजा बांधली. मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई केली होती. यावेळी भाविकांना खिचडी वाटप झाले. दिवसभर बावड्यासह लाईन बाजार, शुगरमील, उलपे मळा, बिरंजे पानंद, कागलवाडी इत्यादी परिसरातून दर्शनासाठी भाविकांची रीघ सुरू होती. सकाळी तुकाराम महाराज मंडप आणि ज्ञानेश्वर महाराज मंडप भजनी मंडळ यांनी भजन सादर केले. सायंकाळी ''श्रीं''च्या मूर्तीची मिरवणूक बावडा मुख्य रस्ता, आंबे गल्ली, जय भवानी गल्ली वेटाळे गल्लीमार्गे पुन्हा मंदिरात आली. उत्सवासाठी पप्पू पाटील, अवधूत गेजगे, संतोष पाटील, अनिल ताटे, अनिल खुटाळे, श्रेयस रेडकर, श्रीकांत खामकर, आबासो रोकडे तसेच महादेव मित्र मंडळाचे सहकार्य लाभले.

02274
वडणगेत भाविकांची गर्दी
वडणगे : येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी होती. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन यात्रा समिती व पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. सरपंच संगीता पाटील, उपसरपंच उमाजी शेलार यांच्या हस्ते आणि सदस्य, यात्रा समिती यांच्या उपस्थितीत महादेव मंदिर व पार्वती मंदिरात मध्यरात्री महारुद्राअभिषेक झाला. गुरव बंधूंनी दोन्ही मंदिरात आकर्षक पूजा बांधली. दुपारी टाळ-मृदंगाच्या गजरात सवाद्य पालखीसोहळा झाला. ठिकठिकाणी खिचडी, लाडू व सरबताचे वाटप झाले. पार्वती व महादेव मंदिर परिसरात आणि पार्वती गल्लीच्या दुतर्फा विविध खेळणी, मिठाई व खाद्यपदार्थाचे स्टॉल मांडले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सवर पदार्थांची तपासणी केली. खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक चौगले, एस. आर. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, माजी खासदार संजय मंडलिक, माजी खासदार निवेदिता माने, शांतादेवी डी. पाटील, राजलक्ष्मी खानविलकर, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, पाटबंधारे कार्यकारी अभियंता स्मिता माने आदींसह भाविकांनी दर्शन घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com