दुर्गमानवाड येथील विठ्ठलाई देवीच्या यात्रेत कोंबड्या-बकऱ्यांचा बळी देण्याची प्रथा यंदाही सुरूच राहणार : पुजाऱ्यांची माहिती

दुर्गमानवाड येथील विठ्ठलाई देवीच्या यात्रेत कोंबड्या-बकऱ्यांचा बळी देण्याची प्रथा यंदाही सुरूच राहणार : पुजाऱ्यांची माहिती

Published on

दुर्गमानवाड विठ्ठलाई यात्रेत
कोंबड्या-बकऱ्यांचा बळी

दरवर्षीप्रमाणे प्रथम कायम ठेवण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
कसबा तारळे, ता.१७ : दुर्गमानवाड (ता. राधानगरी) येथील विठ्ठलाई देवीच्या यात्रेत दरवर्षीप्रमाणे कोंबड्या-बकऱ्यांचा बळी देण्याची प्रथा यावर्षी सुद्धा सुरूच राहणार असल्याची माहिती स्थानिक पुजारी व देवस्थान समितीने दिली.
कसबा तारळे येथे ग्रामदैवत मारुती मंदिराचे नव्याने बांधकाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कसबा तारळे येथील देवी श्री विठ्ठलाईच्या यात्रेदरम्यान पाच दिवस गावात पशुहत्येस बंदी करण्याचा निर्णय ग्रामपंचायत व स्थानिक देवस्थान समितीने घेतल्याच्या पार्श्वभूमीवर दुर्गमानवाड येथील देवी श्री विठ्ठलाईच्या भाविक भक्तांमध्ये दुर्गमानवाडची यात्रा यावर्षी शाकाहारी होणार की मांसाहारी, असा संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून दुर्गमानवाड येथील देवीचे पुजारी व यात्रा समितीची बैठक झाली. त्यानंतर ही माहिती देण्यात आली.
देवी श्री विठ्ठलाईची दुर्गमानवाड येथील मुख्य यात्रा २७ मार्चला होत असून त्या दिवशी प्रथा-परंपरेप्रमाणे भाविक कोंबड्या-बकऱ्यांचा बळी देऊ शकतात. कित्येक वर्षांच्या परंपरेचा इतिहास या यात्रेला असल्याने यामध्ये कसलाही बदल केला जाणार नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
....................
चौकट
कसबा तारळे यात्रा शाकाहारीच !
दुर्गमानवाड व कसबा तारळे अशा दोन ठिकाणी विठ्ठलाईची मंदिरे आहेत. २७ मार्चला दुर्गमानवाडची मुख्य यात्रा होणार असून, २८ मार्चला कसबा तारळे येथील यात्रा होत आहे. दुर्गमानवाड येथे देवीच्या यात्रेदिवशी तसेच काही मोजके दिवस वगळता वर्षभर भाविक कोंबड्या-बकऱ्यांचा बळी देतात; परंतु कसबा तारळे येथील देवीच्या यात्रेसाठी तसेच वर्षभर कधीही पशुहत्या केली जात नाही. मात्र, पै-पाहुण्यांसाठी म्हणून घरोघरी यात्रेदिवशी मांसाहारी जेवणाचा बेत असतो. यंदा ग्रामदैवत श्री मारुतीचे मंदिर नव्याने बांधण्यात येत असल्याने येथील यात्रा यावर्षी शाकाहारीच होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com