

जेनेसिस इन्स्टिट्यूटमध्ये
उद्या ‘पूल कॅम्पस ड्रायव्ह’
कसबा तारळे : गैबी-राधानगरी येथील जेनेसिस इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत बुधवारी (ता. ८) फार्मसी व सायन्सचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या पुरुष उमेदवारांसाठी ''पूल कॅम्पस ड्रायव्ह''चे आयोजन केले आहे. गोवा आणि कोल्हापूर येथे नामांकित औषध कंपन्यांमध्ये नोकरीची शिकाऊ उमेदवार म्हणून संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती ‘जेनेसिस’चे प्रशासकीय प्रमुख डॉ. शोभराज माळवी यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘येथे प्रामुख्याने बी.एस्सी, एम.एस्सी आणि बी.फार्मसी उत्तीर्ण झालेल्या फ्रेशर्स उमेदवारांना प्रोडक्शन आणि क्वालिटी कंट्रोलसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. भरतीमध्ये पात्र उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार २ लाख व अडीच लाखापर्यंत वार्षिक मानधन मिळेल. सकाळी दहायापासून मुलाखतींना सुरुवात होईल. इच्छुकांनी बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात. पूर्वनोंदणीसाठी ‘जेनेसिस’ने उपलब्ध करून दिलेल्या क्यूआर कोडचा वापर करावा.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.