शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणार;अभिजीत तायशेटे: राधानगरीत शाळा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागाची बैठक

शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणार;अभिजीत तायशेटे: राधानगरीत शाळा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागाची बैठक
Published on

03051
राधानगरी तालुक्यातील शाळांत
शैक्षणिक सुविधा पुरवू ः तायशेटे

मुख्याध्यापक, सरपंचासह केंद्रप्रमुखांची बैठक

कसबा तारळे, ता. ७ : ‘‘राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील शाळांसमोर अनेक आव्हाने व समस्या आहेत. त्यांची सोडवणूक करून शाळांना आधुनिक दर्जेदार भौतिक सुविधा पुरविण्याबरोबरच शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी कटिबद्ध राहू’’ अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य व गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजीत तायशेटे यांनी दिली.
गैबी-राधानगरी येथे मतदारसंघातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक झाली. यावेळी शाळांच्या विकासाचा आराखडा मांडताना ते बोलत होते. पंचायत समितीच्या उपाध्यक्ष अश्विनी चौगले यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत अनेकांनी शाळांच्या व दुर्गम भागातील शाळांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तक्रारी केल्या. पावसाळ्यापूर्वी गळती काढण्याबरोबरच वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये; यासाठी शाळांसभोवती भक्कम संरक्षक भिंती उभारण्याची मागणीही झाली. ​सुधारणांचे टप्पे करून प्राधान्यक्रमानुसार ​शाळांचे विद्युतीकरण, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी, विद्यार्थ्यांच्या उंचीनुसार नवीन बेंचची व्यवस्था, आधुनिक किचन शेड, सुसज्ज क्रीडांगणे विकसित केली जातील. यासह विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू, असे तायशेटे यांनी सांगितले. ​बैठकीत चौगले, माजी उपसभापती मोहन पाटील, गटशिक्षणाकारी धनंजय मेंगाणे, विस्ताराधिकारी प्रकाश काळे आदींनी मनोगते व्यक्त केले. दत्तात्रय पाटील, चंद्रकांत चौगले, प्रकाश कानकेकर, एकनाथ कांबळे, मधुकर मुसळे, सूर्यकांत सावंत, डी. जी. पाटील, संजय पाटील, भरत कासार उपस्थित होते. शिवाजी चौगले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com