राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त कसबा तारळे येथील न्यू हायस्कूलमध्ये ग्रंथांचा जागर

राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त कसबा तारळे येथील न्यू हायस्कूलमध्ये ग्रंथांचा जागर
Published on

हायस्कूलमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन

कसबा तारळे : येथील न्यू हायस्कूलमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त ‘ग्रंथांचा जागर’ हा उपक्रम राबविला. केवळ परीक्षेसाठी पुस्तके वाचणारे विद्यार्थी न बनता, आयुष्य समजून घेण्यासाठी वाचणारे विद्यार्थी बनण्यासाठी संस्कारशील माणूस होण्याची शक्ती मिळो, अशी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी केली. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शालेय ग्रंथालयास प्रत्येकी एक पुस्तक दान केले. यावेळी पत्रलेखन स्पर्धा घेतली. निवृत्त मुख्याध्यापक एम.बी.पाटील यांच्या हस्ते ग्रंथालयाचे पूजन झाले. ग्रंथालयाचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक एम. डी. मांगोरे व शिक्षण संस्थेचे सचिव प्रशांत पाटील यांच्या हस्ते झाले. रंगनाथन यांच्या कार्याचा परिचय संचिता कुंभार हिने करून दिला. एस.आर.जमाल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी परिपाठ सादर केला. यावेळी श्रध्दा शिऊडकर व श्रुतिका सुतार यांनी पुस्तक की मोबाईल? असा संवाद साधला. एस.एस.आरडे, जी. पी. मोहिते, प्रवीणा भोगटे यांची भाषणे झाली. संचिता कुंभार हिने सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com