कोतोली येथे पन्हाळा तालुक्यातील पाठ्यपुस्तक वितरण

कोतोली येथे पन्हाळा तालुक्यातील पाठ्यपुस्तक वितरण

00658
मोफत पाठ्यपुस्तकांचे
कोतोलीत वितरण

सकाळ वृत्तसेवा

कोतोली ता. १ : प्राथमिक शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळावीत या शासनाच्या धोरणानुसार पन्हाळा तालुका स्तरावरील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध झालेली असून या पाठ्यपुस्तकांचा वाटप प्रारंभ शनिवारी (ता. १) गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर यांच्या अध्यक्षतेखाली कोतोली (ता. पन्हाळा) येथील जीवन शिक्षण विद्यामंदिरात मान्यवरांच्या हस्ते झाला.
पन्हाळा तालुक्यातील पहिली ते आठवीच्या मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या १८ केंद्रांतील विद्यार्थ्यांना ५८ हजार ५६४ पुस्तके उपलब्ध झाली आहेत. त्यांचे वाटप जीवन शिक्षण विद्यामंदिर कोतोली येथे पाठ्यपुस्तक विभाग केंद्रप्रमुख सदाशिव चौगुले व किरण सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज ६ केंद्र याप्रमाणे १ ते ३ जून या कालावधीत नियोजित केले आहे. याप्रसंगी केंद्रप्रमुख तुळशीदास सातपुते, दत्तात्रय पाटील, परशुराम चव्हाण उपस्थित होते. पाठ्यपुस्तक वितरण व्यवस्थेसाठी विलास कुंभार, संग्राम बंगे, संजय बचाटे, संजय माने, सुशीलकुमार शेटे, युवराज पाटील, बाजीराव पाटील, संदीप गाडगीळ, रामदास झेंडे यांचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com