विद्युत उपकरणांची हाताळणी काळजीपूर्वक करावी : झिमरे

विद्युत उपकरणांची हाताळणी 
काळजीपूर्वक करावी : झिमरे
Published on

कोतोली : येथील नेहरू हायस्कूलमध्ये कार्यशाळेसाठी उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी.

विद्युत उपकरणांची हाताळणी
काळजीपूर्वक करावी : झिमरे
कोतोलीत राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
कोतोली, ता. २ : विद्युत उपकरणांची हाताळणी करताना अपघात घडून जीवितहानी व वित्तहानी होऊ नये यासाठी उपकरणांची हाताळणी काळजीपूर्वक करावी, असे आवाहन महाराष्ट्र शासन ऊर्जा विभागाच्या कोल्हापूर येथील असिस्टंट इंजिनियर स्मिता झिमरे यांनी केले आहे.
कोतोली (ता. पन्हाळा) येथील नेहरू विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त महाराष्ट्र शासन ऊर्जा विभाग व महावितरण यांच्यातर्फे आयोजित कार्यशाळेत झिमरे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. एस. पोर्लेकर होते.
महावितरणचे उपअभियंता अजय जाधव व सुलतान शेळके यांनी विद्यार्थ्यांना घरामध्ये तसेच शेतामध्ये विजेचा वापर करताना कोणकोणते धोके व अपघात घडतात याची माहिती व्हिडिओद्वारे दिली. अपघात टाळण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत हे समजावून सांगितले. कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, सुरेश लोहार, लक्ष्मी बोरगे, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुभाष लव्हटे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com