अनुदानित महाविद्यालयातील पदांच्या भरतीसाठी पात्रताधारक आक्रमक

अनुदानित महाविद्यालयातील पदांच्या भरतीसाठी पात्रताधारक आक्रमक

Published on

00935
अनुदानित महाविद्यालयातील पदांच्या
भरतीसाठी पात्रताधारक आक्रमक

राज्य ग्रंथपाल महासंघाची निवेदनाद्वारे मागणी

सकाळ वृत्तसेवा

कोतोली, ता. ५ : अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील महत्वाचे व एकाकी असलेले प्राध्यापक संवर्गातील ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक व प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया विविध कारणांनी रेंगाळली आहे. या पदांची भरतीप्रक्रिया तातडीने सुरू करावी, यासाठी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर व सहसंचालक डॉ. प्रलाश वाच्छाव यांना महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या वतीने भूषण आहिरे, तेजस रेवाले, राहील तामारे, राजाभाऊ मोरे आदींनी निवेदन दिले.
कोविडच्या पार्श्वभूमीवर पदभरतीवर निर्बंध होते. राज्य ग्रंथपाल महासंघ संघटनेच्या पाठपुराव्यानंतर २०२३ मध्ये राज्य शासनाने पदभरतीचा निर्णय काढत २०१७ पर्यंतच्या ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालकांची २२३ पदे भरण्यासाठी मंजुरी दिली. मात्र २०१७ च्या नंतरच्या रिक्त पदांना अद्याप मंजुरी नाही. २०१७ पूर्वीच्या मंजूर पदांची भरतीही दीड वर्षापासून रेंगाळली आहे. नॅक मूल्यांकन व इतर मूल्यांकन समितीच्या दृष्टीने कायमस्वरूपी ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदे महत्त्वाचे मानले जाते. मात्र पद चुकीच्या धोरणामुळे रिक्त आहे.

कोट
ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदे रिक्त असल्याने महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा खालावत आहे. याची उच्च शिक्षणमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी. ही पदे प्राचार्य पदाप्रमाणे भरावीत. पद रिक्त असेल तेथे भरतीसाठी विनाअट परवानगी द्यावी.
- डॉ. रवींद्र भताने, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com