माळवाडी कुस्ती मैदानात भगत खोत विजयी

माळवाडी कुस्ती मैदानात भगत खोत विजयी
Published on

01290

माळवाडी कुस्ती मैदानात भगत खोत विजयी
हनुमान व म्हसोबा यात्रेनिमित्त आयोजन; जय महाराष्ट्र तरुण मंडळाचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

कोतोली, ता. २६ : कोतोली पैकी माळवाडी (ता. पन्हाळा) येथे हनुमान व म्हसोबा यात्रेनिमित्त जय महाराष्ट्र तरुण मंडळातर्फे भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पहिल्या क्रमांकाची कुस्ती माळवाडी येथील भगत खोत आणि शाहू आखाडा येथील युवराज म्हेत्तर यांच्यात झाली. चटकदार झालेल्या कुस्तीमध्ये भगत खोत विजयी झाला. त्याला आयोजकांकडून २०,००० हजार रुपये बक्षीस देण्यात आले.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती मोतीबाग तालीम येथील सुभाष निऊंगरे आणि कुंभी संकुल येथील पैलवान प्रवीण पाटील यांच्यात झाली. बराच वेळ चाललेली कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. त्यांना १५,००० रुपये बक्षीस देण्यात आले. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कुंभी संकुल येथील शैलेश पाटील आणि मोतीबाग तालीम येथील पैलवान विनायक वास्कर यांच्यात झाली. यामध्ये शैलेश पाटील विजयी झाला. त्याला आयोजकांकडून १०,००० हजार रुपये बक्षीस देण्यात आले.
या तीन मुख्य कुस्त्यांबरोबर लहान-मोठ्या ७५ कुस्त्या झाल्या. यामध्ये महिलांच्या कुस्त्यांचादेखील समावेश होता. कुस्ती मैदानासाठी तिरपण, आळवे, पिंपळे, कसबा ठाणे, बांदिवडे, गंगावेश तालीम, कुंभी संकुल येथील मल्ल आले होते. पंच म्हणून श्रीकांत सागावकर, गोविंद सागावकर, डॉ. अरविंद खोत, श्रीकांत पाटील, आदिनाथ बंगे आणि मारुती पाटील यांनी तर निवेदक म्हणून दीपक वरपे यांनी काम पाहिले. यावेळी जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com