भाचरवाडी-खडेखोळ दरम्यान रस्ता खचला
01344
भाचरवाडी-खडेखोळ रस्ता खचला
उपाययोजना गरजेची ; पावसाळ्यात वाहतूक बंद होण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
कोतोली ता. २७ : भाचरवाडी ते खडेखोळ (ता. पन्हाळा) दरम्यानच्या मुख्य मार्गावरील रस्ता आठ-दहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने खचला आहे. येथे आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा पावसाळ्यात अतिवृष्टीने रस्ता पूर्णपणे खचून वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी भर टाकून वाहतूक सुरळीत चालू राहील याची व्यवस्था करावी; अशी मागणी होत आहे.
मानेवाडी ते खडेखोळ हा चार किलोमीटरचा रस्ता पंधरा वर्षांपूर्वी पहिल्यांदा पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून झाला. त्यावेळी झालेले काम उत्कृष्ट दर्जाचे झाले. त्यानंतर आठ-दहा वर्षे हा रस्ता वाहतुकीस सुरळीत सुरू होता. कालांतराने हा रस्ता खराब होऊन वाहतुकीस त्रासदायक बनला होता. त्यातच या परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने दोन-तीन वर्षांपासून रस्ता अनेक ठिकाणी खचत चालला आहे.
याबाबत अनेकदा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत दै. ‘सकाळ’मधून बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर या रस्त्याच्या कामासह खचलेल्या ठिकाणच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र दहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने पुन्हा याठिकाणी रस्ता खचला आहे.
चौकट
सूचना फलक लावा
खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून प्रशासनाने बॅरिगेट्स लावण्याबरोबर आवश्यक असणाऱ्या उपाययोजना करून रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
कोट -
भाचरवाडी-खडेखोळ मार्गावर प्रत्येक पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्ता खचून वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून रस्ता वाहतुकीस नेहमी सुरू राहील याची दक्षता घ्यावी.
- संभाजी रेडेकर, भाचरवाडी, वाहनधारक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

