कोतोलीत विविध दाखल्यांचे वाटप

कोतोलीत विविध दाखल्यांचे वाटप

Published on

01412

कोतोलीत विविध दाखल्यांचे वाटप
कोतोली : कोतोली (ता. पन्हाळा) येथे मुख्यमंत्री गतिमान प्रशासन योजनेंतर्गत तहसीलदार माधवी शिंदे-जाधव यांच्याहस्ते विविध दाखल्यांचे वाटप झाले. अध्यक्षस्थानी सरपंच वनिता पाटील होत्या. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग पेन्शन या आणि इतर योजनांसाठी लागणारे दाखले एका दिवसात देण्यात आले. तहसीलदार माधवी शिंदे-जाधव म्हणाल्या, ‘तहसील कार्यालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाचे मंडलनिहाय शिबिराचे आयोजन केले आहे. त्यांनी विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी उपसरपंच अजित पाटील, प्रशांत पाटील, महादेव पाटील, सागर लव्हटे, मंडल अधिकारी राजेंद्र सुतार, ग्राम महसूल अधिकारी एकनाथ गंभीरे, सर्जेराव शिंदे, सुप्रिया काशीद, सागर जगताप, विद्या देशमुख, कृषी विभागाचे तानाजी पाटील, सचिन पवार तसेच महा-ई-सेवा केंद्राचे चालक, पोलिसपाटील, रेशन धान्य दुकानदार, लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com