Wed, Feb 8, 2023

कुंभोजमध्ये आजपासून शिबीर
कुंभोजमध्ये आजपासून शिबीर
Published on : 16 January 2023, 11:28 am
कुंभोजमध्ये
आजपासून शिबिर
कुंभोज ः मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त अॅड. शुक्राचार्य जमणे युवा शक्तीच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचे शिबिर मंगळवारी (ता. १७) जानेवारी ते (ता. २६) फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला आहे. लाभार्थ्यांनी मोफत नोंदणीचा लाभ घ्यावा. आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड, ई-श्रम कार्ड, आभा कार्ड यासारख्या योजना फायदेशीर असून त्यामध्ये नागरिकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते वैभव जमणे यांनी केले आहे.