कवठेसारमध्ये विद्यार्थिनींना सायकल वाटप

कवठेसारमध्ये विद्यार्थिनींना सायकल वाटप

Published on

04438
कवठेसार : विद्यार्थिनींना सायकल वाटप करताना सरपंच पोपट भोकरे. शेजारी आप्‍पासाहेब तेरदाळे, विजय नांद्रे, अजित पाटील, सुशांत पाटील, एस. एस. पाटील.
-----------
कवठेसारमध्ये विद्यार्थिनींना सायकल वाटप
कुंभोज ः कवठेसार येथील दादा नाना भोकरे हायस्कूलमध्ये नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. लोकनियुक्‍त सरपंच पोपट भोकरे अध्‍यक्षस्‍थानी होते. विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिलेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण तसेच विद्यालयातील गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप केले. विद्यालयाच्या नूतन मुख्याध्यापिकापदी नेमणूक झाल्याबद्दल सौ. एस. एस. पाटील यांचा सन्मान केला. शालेय समिती सदस्य आप्पासाहेब तेरदाळे, विजय नांद्रेकर, अजित पाटील, सुशांत पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ. पाटील यांनी स्‍वागत केले. सौ. ए. एस. मादनाईक यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. एस. वाडकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com