

औषधांसाठी मदत
कुंभोज, ता. १७ ः येथील प्रगतशील शेतकरी भरतेश्वर आण्णा चौगुले यांनी येथील प्राथमिक आरोग्य पथकात उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांच्या औषधांसाठी पाच हजार रूपयांची मदत वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू गोडबोले, डॉ. स्नेहल शिंदे यांच्याकडे सुपुर्द केली. येथील प्राथमिक आरोग्य पथकात बाह्यरूग्णांची संख्या मोठी आहे. गरजू रुग्णांना औषधे मिळावीत, यासाठी पैसे दिल्याचे मत श्री. चौगुले यांनी व्यक्त केले. भारत जमणे, सुरेश भगत, सागर जमणे, औषधनिमा॔ता एम. बी. भरमगोंडा, ए. सी. जाधव, फजलेकरी मुल्ला, बी. एम. कुंभार, व्ही. डी. लोखंडे आदी उपस्थीत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.