कुंभोजला आरोग्य पथकात रिक्त पदे

कुंभोजला आरोग्य पथकात रिक्त पदे

Published on

कुंभोजला आरोग्य पथकात रिक्त पदे
सेवेवर परिणाम ः तत्काळ भरण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कुंभोज ता. ७ ः येथील प्राथमिक आरोग्‍य पथकाला रिक्‍त पदाचे ग्रहण लागले आहे. याचा परिणाम थेट आरोग्‍य सेवेवर होत आहे. रिक्‍त जागा तत्‍काळ भरून परिपूर्ण आरोग्‍य सेवा मिळावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
येथील मुख्‍य बसस्‍थानक परिसरात सुसज्‍ज प्राथमिक आरोग्‍य पथक आहे. दररोज सुमारे दोनशेहून अधिक बाह्यरुग्‍ण विविध उपचारांसाठी येतात. कुंभोजसह हिंगणगाव, दुर्गेवाडी, नेज, शिवपुरी येथील शेकडो रुग्‍णांची काळजी घेणारे हे केंद्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अडचणीत सापडले आहे. कर्मचारी नसल्‍यामुळे केंद्राचा भार उपस्थित कर्मचाऱ्‍यांवर पडला आहे. सध्या केंद्रात दोन आरोग्‍य सेविका पद व एक औषध निर्माता पद मंजूर असून तिन्‍ही पदे रिक्‍त आहेत. याशिवाय शिपाई पद रिक्‍त आहे. रिक्‍त पदे तत्‍काळ भरावीत, अशी मागणी होत आहे.
-----------
पदे-मंजूर पदे-रिक्‍त पदे
वैद्याकीय अधिकारी-२---
आरोग्‍य सेविका-२-२
औषध निर्माता-१-१
शिपाई-३-१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.