गुरुकुलांमध्ये मुलांवर संस्कार

गुरुकुलांमध्ये मुलांवर संस्कार

Published on

गुरुकुलांमध्ये मुलांवर संस्कार
विशुद्धसागर महाराज : बाहुबली येथे आशीर्वचन
सकाळ वृत्तसेवा
कुंभोज, ता. ८ : लौकिक व आध्‍यात्‍मिक शिक्षण द्यायचे असेल तर गुरुकुलांशिवाय पर्याय नाही. गुरुकुलांमध्‍ये मुलांवर संस्‍कार केले जातात. समाज संस्‍कारमय बनावा यासाठी गुरुदेव समंतभद्र महाराजांनी अशी अनेक गुरुकुले उभारली. यामध्‍ये मुलांना संस्‍कारयुक्‍त लौकिक व आध्‍यात्‍मिक शिक्षण दिले जाते, असे प्रतिपादन आचार्य १०८ श्री विशुध्‍दसागर महाराज यांनी केले.
बाहुबली येथे आयोजित कार्यक्रमांत त्‍यांनी आशीर्वचन दिले. ते म्‍हणाले, ‘गुरुदेव समंतभद्र महाराजांचा हा ज्ञानरथ सर्वांनी अशाच प्रकारे पुढे चालू ठेवावा. परिसरातील समाजबांधव ज्ञानाच्‍या या संस्‍कारकेंद्राच्‍या माध्‍यमातून प्रकाशित होत राहो. ज्ञानाची भक्‍ती हीच विद्यार्थ्‍यांच्‍या जीवनाची शिदोरी असते. ही न संपणारी ज्ञानाची शिदोरी निश्‍चितच सर्वांना जीवनात सुख, समाधान मिळवून देईल.’ संस्‍थेतर्फे महामंत्री डी. सी. पाटील, संचालक गोमटेश बेडगे, आदींनी आचार्यश्रींचे पादप्रशालान करून शास्‍त्र भेट दिले. बाबासाहेब पाटील, श्रीधर मगदूम, बाळासाहेब चोपडे, धनराज बाकलीवाल, नेमिचंद पाटील, रायचंद हेरवाडे, तात्‍यासाहेब अथणे, जयकुमार उपाध्‍ये, मिलिंद अकिवाटे उपस्थित होते.
--------------
अनेकांत शोधपीठास भेट
येथील डोंगर पायथ्‍याला असलेल्‍या अनेकांत शोधपीठाच्‍या कार्यालयास आचार्यश्रींनी संघासह भेट दिली. येथील संरक्षित होत असलेल्‍या ताम्रपत्र, ताडपत्र व विविध ग्रंथांची पाहणी व अवलोकन करून समाधान व्‍यक्‍त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.