अंगणवाडी सेविका - मदतनीसचे हात रिकामेच

अंगणवाडी सेविका - मदतनीसचे हात रिकामेच

Published on

अंगणवाडीसेविका, मदतनीसांना
प्रतीक्षा प्रोत्साहन भत्त्याची

‘लाडक्‍या बहिणी’ ‍अर्जानंतर मिळणार होते ५० रूपये

सकाळ वृत्तसेवा

कुंभोज ता. ७ : राज्‍य शासनाने ‘मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण''योजना सुरू केली.राज्‍यातील बहीणींनी यासाठी अर्ज सादर केले.या योजनेमध्‍ये अंगणवाडी सेविकांनाही सहभाग करून घेतले. याबद्‍दल त्‍यांना प्रत्‍येक लाभार्थीमागे ५० रूपये प्रोत्‍साहन भत्ता दिला जाणार होता. ''लाडक्‍या बहिणीं''च्‍या खात्‍यावर साडेसात हजार रुपये जमा झाले. पण हातकणंगले तालुक्‍यातील ९३७ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे हात रिकामेच आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांमधून नाराजीचा सूर निघत आहे.
''लाडकी बहीण''योजना सुरू झाल्‍यानंतर अधिकाधिक महीलांना लाभ मिळवून देण्‍यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रोत्‍साहन म्‍हणून ५० रूपये प्रत्‍येक अर्जासाठी देण्‍याचे शासनाकडून सांगितले होते. अंगणवाडी सेविकांना त्‍या कामाचा मोबदला मिळाला नाही. अंगणवाडी सेविकांसह सेतू केंद्र, ग्रामसेवक, आशा स्‍वयंसेविकांनीही अर्ज भरले आहेत. मात्र अ्दयाप त्‍यांच्‍या खात्‍यात पैसे जमा झाले नाहीत.

दृष्‍टीक्षेपात
तालुक्‍याती अंगणवाड्‍या
तालुक्‍यातील अंगणवाड्‍या-४८०
अंगणवाडी सेविका-४७७
मदतनीस-४६०
मिळणारा प्रोत्‍साहन भत्ता-५०

0कोट0
राज्‍य शासनाच्‍या सूचनेप्रमाणे अंगणवाडी सेविकांनी आॅनलाईन अर्ज भरले. ज्‍या महिलांचे अर्ज भरले त्‍यांच्‍या खात्‍यावर पैसे जमा झाले, पण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. यासंदर्भात सविस्‍तर माहिती दोन दिवसांपूर्वीच महिला बालविकास प्रकल्‍प कार्यालयाने घेतली आहे.
- सुजाता शिंदे, प्रकल्‍प अधिकारी, हातकणंगले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com