महागाव  लोकसेवा उत्तीर्ण सत्कार

महागाव लोकसेवा उत्तीर्ण सत्कार

Published on

01419
प्रामाणिक परिश्रमाने
यश मिळतेच
आयुक्त उत्तुरे; महागावला सत्कार समारंभ
महागाव, ता. १६ : जीवन जगत असताना प्रत्येकजण नशिबाला दोष देतो. वास्तविक जीवनातील एक टक्का यश हे नशिबावर अवलंबून असते. तर ९९ टक्के यश परिक्षमावर अवलंबून असते परिक्षम प्रामाणिक असल्यास यश मिळतेच; असे प्रतिपादन आयकर आयुक्त मल्लिकार्जुन उत्तुरे यांनी केले.यांनी केले. ते महागाव (ता. गडहिंग्लज) येथील सुमित्रा प्रतिष्ठान संचलित एकाग्रता अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्रात आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीवरुण बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास अधिकारी प्रेमकुमाकर नाईक होते.
लोकसेवा आयोग, विविध स्पर्धा परीक्षांतून विविध पदांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षकपदी सचिन पाटील, पोस्टल असिस्टंटपदी अनिकेत देसाई, पोलिस भरती झालेले राहुल करवळ, स्वाती तिळवले यासह दहावी, बारावी परीक्षेत यश मिळवलेले प्रथमेश शिंगटे, विनित जोशीलकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रेमकुमार नाईक यांनी करिअर मार्गदर्शन करण्यात आले. सूत्रसंचालन नम्रता खानापुरे, प्रास्ताविक अंकिता कुपटे व आभार शितल गोंधळी यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.