राजे पुरवणी लेख....नव्या विचारांचे, कणखर, बलाढ्य नेतृत्व...... राजे समरजितसिंह घाटगे. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजे पुरवणी लेख....नव्या विचारांचे, कणखर, बलाढ्य नेतृत्व...... राजे समरजितसिंह घाटगे.
राजे पुरवणी लेख....नव्या विचारांचे, कणखर, बलाढ्य नेतृत्व...... राजे समरजितसिंह घाटगे.

राजे पुरवणी लेख....नव्या विचारांचे, कणखर, बलाढ्य नेतृत्व...... राजे समरजितसिंह घाटगे.

sakal_logo
By

विकासाभिमुख नेतृत्व

कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून कागल तालुक्याची ओळख आहे. याच तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर छाप पाडली. कार्यकर्त्यांना कुटुंबाचा घटक मानून त्यांच्या सुख-दुःखात समरस होणारे राजे समरजितसिंह घाटगे हे नव्या विचारांचे, कणखर, बलाढ्य नेतृत्व आहे. त्यांनी शाहू ग्रुप यशस्वीपणे चालवताना गटही भक्कमपणे उभा केला. कागल तालुक्यातील राजकारणातील निष्कलंक, विकासाभिमुख, ध्येयवादी नेतृत्व म्हणजे राजे समरजितसिंह घाटगे होय. आज त्यांचा वाढदिवस, त्यानिमित्त...

समरजितसिंह घाटगे यांनी शाहू साखर कारखाना उत्तम चालिवला आहेच. त्याचबरोबर राजे विक्रमसिंह घाटगे बँक, शाहू कृषी संघ अशा विविध संस्थांची यशस्वी घोडदौड सुरू आहे. कृषी संघाचा कागल बझार, श्रीमंत जयसिंगराव घाटगे शैक्षणिक संकुल, सहकारी पाणीपुरवठा संस्थांना ठिबक सिंचन, राजे फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, दलित तरुणांसाठी दलित चेंबर ऑफ कॉमर्सबरोबर शाहू ग्रुपचा करार, जिल्ह्यातील नामवंत ब्रँडबरोबर करार करून युवकांना रोजगार देण्याची ‘स्टार्टअप कोल्हापूर’ ही संकल्पना ते यशस्वीपणे राबवत आहेत. राजे बँकेच्या पुढाकारातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी जिल्ह्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील नागरी बँकांना संघटित केले आहे. राजमाता जिजाऊ महिला संघटनेच्या माध्यमातून महिला व बालकांसाठी विविध आरोग्य शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रशिक्षण घेण्यात संस्थेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांना प्रोत्साहित केले आहे. कर्करोगासारख्या आजाराबद्दल ग्रामीण भागातील महिलांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या पदार्थांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम संस्थेमार्फत सुरू आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना राजे समरजितसिंह घाटगे यांनी जनतेच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवला. शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळावे म्हणून त्यांनी जिल्हाभर ‘शिवार संवाद’ कार्यक्रमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला. वेळोवेळी आंदोलने केली. भाजपच्या माध्यमातून त्यांनी कागलच्या राजकारणात केलेली एंट्री लक्षवेधी ठरली. मतदारांपर्यंत पोचण्यात ते यशस्वी झाले आहेतच; त्याचबरोबर जनतेतही ते समरस झाले आहेत. जिल्ह्यातीलच तरुण वर्गात त्यांच्याविषयी विशेष आकर्षण आहे. केवळ राजकारणासाठी राजकारण न करता समाजकारणातून जनतेचा शाश्वत विकास कसा होईल याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. तरुण पिढी निरोगी व सुसंस्कारित व्हावी, ती स्वतःच्या पायावर उभी राहावी, महिलांच्या हाताला काम मिळावे, दिव्यांगांना शासकीय लाभ मिळावेत, माजी सैनिकांना सन्मानाने जीवन जगता यावे, शेतकऱ्यांना कमी खर्चात शेतीतून जादा उत्पन्न घेता यावे, यासाठी विविध स्तरांवर सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
जलयुक्त शिवार योजना, युवकांसाठी कौशल्य विकास योजना, मुद्रा कर्ज योजना, आजी-माजी सैनिकांसाठी जय जवान कर्ज योजना, शेतकऱ्यांसाठी ठिबक योजना, निराधारांसाठी पेन्शन योजना, बांधकाम कामगार योजना, खेळाला प्राधान्य देण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांना पाठबळ, महिलांसाठी ग्रामीण भागात कॅन्सर तपासणी तसेच मार्गदर्शन शिबिरे, आरोग्याच्या समस्यांनी पीडित रुग्ण, मुलांसाठी राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनमार्फत जाऊन धावून जाणारे ‘आरोग्यदूत’ अशा कितीतरी उपक्रमांतून ते सातत्याने जनतेच्या संपर्कात आहेत. तरुणांनी स्वावलंबी बनावे, स्वतःचे उद्योग सुरू करावेत यासाठी त्यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून केलेले काम प्रेरणादायी आहे.
समरजितसिंह घाटगे यांनी शाहू ग्रुपची धुरा हाती घेतल्यानंतर गट बांधणीस प्राधान्य दिले. त्यामध्ये त्यांना मोठे यश मिळत आहे. कागल तालुक्यात भाजप पक्ष अस्तित्वात नव्हता. अशावेळी दादांमुळे भाजपला जिल्ह्याच्या राजकारणात मोठी मदत झाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांचा दादांनी बारकाईने अभ्यास करून त्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोचण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत. केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून मतांच्या बेरजेसाठी राजकारण करण्याचा उद्देश समरजितसिंह घाटगे यांनी कधीही डोळ्यासमोर ठेवला नाही. पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या समरजितदादांच्या झंझावाताने कागल तालुक्यात बदलाचे वादळ निर्माण झाले आहे. समाजातील सर्व स्तरांतून दादांना पाठिंबा मिळत आहे. अव्याहतपणे राजकीय, सामाजिक, वाटचाल करणाऱ्या बलाढ्य नेतृत्वास दीर्घायुष्यासाठी वाढदिवसाच्या आरोग्यदायी खूप खूप शुभेच्छा.....
- रमेश पाटील, म्हाकवे