जाहिरात होती बातमी फोटोंसह आवश्यक लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे कार्य स्फूर्तीदायक: बंडोपंत चौगुले स्व.मंडलिक यांचा ८वा स्मृतीदिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात होती बातमी फोटोंसह आवश्यक    लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे कार्य स्फूर्तीदायक: बंडोपंत चौगुले  स्व.मंडलिक यांचा ८वा स्मृतीदिन साजरा

sakal_logo
By

04289
लोकनेते मंडलिक
यांचे कार्य स्फूर्तीदायी
बंडोपंत चौगुले; स्व. मंडलिक यांचा स्मृतिदिन

म्हाकवे, ता. १० : दिव्यदृष्टी लाभलेल्या लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी कागल तालुक्यात दूधगंगेचे पाणी वेदगंगेत आणून नदीजोड प्रकल्प राबविला. कच्च्या कालव्यातून पाणी सोडल्याने तालुक्यात हरितक्रांती साधली आहे. पदाचा वापर शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हितासाठी केला. यामुळे कागल तालुका २५ वर्षांनी पुढे जावून प्रगती साधू शकला. त्यामुळेच स्व.मंडलिक यांचे कार्य दीपस्तंभासारखे स्फूर्ती देणारे आहे, असे उद्गार ‘सदासाखर’चे संचालक, माजी उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले यांनी काढले.
म्हाकवे येथे स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या ८ व्या स्मृतीदिनानिमित्त ते बोलत होते. प्रतिमापूजन पांडुरंग पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी दिनेश पाटील, माजी सरपंच एकनाथ पाटील, प्रा. बी. डी. चौगुले, डॉ. विजय चौगुले, जयदत्त पोवार, वसंत पाटील, सुनील देवडकर, गजानन चौगुले, अशोक चौगुले, बाबुराव पाटील, तुकाराम पाटील, आनंदा माने, सिद्राम देवडकर, सागर पाटील, रवींद्र पाटील, आबास पाटील, राजाराम गंगाधरे उपस्थित होते.