शाळेचे वैभव ग्रंथालय ठरण्यासाठी ग्रंथदान उपक्रम चळवळ व्हावी  : जीवन साळोखे : ग्रंथदान उपक्रमांतर्गत म्हाकवे इंग्लिश स्कूलला पुस्तके भेट

शाळेचे वैभव ग्रंथालय ठरण्यासाठी ग्रंथदान उपक्रम चळवळ व्हावी : जीवन साळोखे : ग्रंथदान उपक्रमांतर्गत म्हाकवे इंग्लिश स्कूलला पुस्तके भेट

04787
म्हाकवे इंग्लिश स्कूलला
ग्रंथदान उपक्रमांतर्गत पुस्तके भेट

म्हाकवे : वाचन प्रोत्साहन तसेच शालेय ग्रंथालय समृद्ध होण्यासाठी शाळांमध्ये ग्रंथदान उपक्रम राबविणे आवश्यक आहे. समृध्द शालेय ग्रंथालय शाळेचे खरे वैभव आहे. मुख्याध्यापक, शिक्षकांनी अधिक वाचते होऊन विद्यार्थ्यांना वाचते करावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांनी केले. म्हाकवे इंग्लिश स्कूलमध्ये ‘आपल्या ग्रंथदान’ उपक्रमांतर्गत पुस्तक संच वाटपावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पी. व्ही. पाटील होते. यावेळी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ए. आर. खामकर, हळदी हायस्कूलचे मुख्याध्यापक जी. के. भोसले, श्रीकांत पाटील उपस्थित होते.
जीवन साळोखे यांनी दिलेल्या दर्जेदार पुस्तकांचे वाटप तालुक्यातील चिखली, कौलगे, खडकेवाडा, बाचणी, सुळकूड, मौजे सांगाव, कसबा सांगाव, आनुर, म्हाकवेतील शाळांना पुस्तके भेट देण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक म्हाकवे हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. बी. भारमल यांनी केले. यावेळी ए. आर. खामकर, पी. व्ही. पाटील, के. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. युवराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आर. आर. पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com