भक्तिभाव, निष्ठाभाव विकत मिळत नाही  : परमात्मराज महाराज : श्री दत्त देवस्थान मठाच्यावतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त प्रवचन

भक्तिभाव, निष्ठाभाव विकत मिळत नाही : परमात्मराज महाराज : श्री दत्त देवस्थान मठाच्यावतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त प्रवचन

04880, 04881
भक्तिभाव, निष्ठाभाव विकत मिळत नाही
परमात्मराज महाराज : आडीत कार्तिक पौर्णिमेनिमित्त प्रवचन

सकाळ वृत्तसेवा

म्हाकवे, ता. २८ : सद्विचारांचे मंगलसूत्र बुद्धीजवळ असणे आवश्यक असते. भक्तिभाव आणि निष्ठाभाव विकत मिळत नाही. या गोष्टी परमार्थमार्गात जपून ठेवाव्या लागतात, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले.
आडी (ता. निपाणी) येथील संजीवनगिरीवरील श्रीदत्त देवस्थान मठातर्फे कार्तिक पौर्णिमेनिमित्त सर्वेज्य सांस्कृतिक भवनात प्रवचनावेळी ते बोलत होते. सकाळी श्री दत्त मंदिरात श्री दत्तगुरुचरणी अभिषेक, महाआरती झाली. रात्री नामजपानंतर प्रवचन झाले.
परमात्मराज महाराज म्हणाले, ‘जपमाळेमध्ये धाग्यामुळे मणी एकत्र येतात, त्याप्रमाणे समन्वयाच्या सूत्राद्वारे जगातील विविध धर्म, संप्रदाय जोडले जाणे स्वाभाविक आहे. जगात अनेक ग्रंथ आहेत, भरपूर काही आहे पण समन्वयाची सूत्रबद्धता नाही. हजारो वर्षं अमानुष वर्तन घडलेल्या जगात सहजासहजी बदल होणार नाही. कर्माचा भोग भोगावा लागतो, हा कर्माचा सिद्धांत आहे. ज्यांना चांगले व्हावे अशी इच्छा असते त्यांच्यासाठी हा अध्यात्म विचार आहे. माणसाने अभिमान बाळगू नये. घरी भाजी बनवून खावी लागते. ती आपोआप होत नाही. तर मग ग्रह, तारे आपोआप नियम बद्ध कसे फिरत राहतील? विविध दर्शने, शास्त्रे परस्परविरोध करीत नाहीत. मतभेद सोडून देऊन उद्देश समजून घेणे आवश्यक आहे. कर्मसिद्धांतावर विश्वास पाहिजेच. जे मिळायचे ते मिळणारच.’
प्रसाद वाशीकर हुपरी यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. विवेकानंद कुलकर्णी, प्रा. ए. डी. चौगुले, प्रा विजय खोत, विठ्ठल शिंदे, गणेश ढवळे, अभिनंदन खोत, नामदेव चव्हाण, सचिन बनछोडे, वैभव पाटील, संजय गुरव, पोलिस अधिकारी पुंडलिक सावंत यांचा परमात्मराज महाराज व देवीदास महाराजांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी कागल परिसरासह बेळगांव, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह कर्नाटक, गोव्यातून आलेल्या भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com