शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची वज्रमूठ

शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची वज्रमूठ
Published on

05065
व्हनाळी : येथे नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आयोजित सर्वपक्षीय बैठकीप्रसंगी गोकुळचे संचालक अंबरीशसिंह घाटगे, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, मल्हारी पाटील आदी. (छायाचित्र ः सागर लोहार, साके)
................
शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची वज्रमूठ

व्हनाळीत सर्वपक्षीय बैठक; शेतकरी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार

सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता. ३ : गोव्याला जाण्यासाठी कागल-आजरा-आंबोलीमार्गे सुरक्षित मार्ग आहे. मग शक्तिपीठाच्या नावाखाली नागपूर-गोवा हा नवीन महामार्ग कशासाठी? शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या या शक्तिपीठ महामार्गाविरोधात वज्रमूठ बांधण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय बैठकीत केला.
व्हनाळी (ता. कागल) येथील कै. मेजर आनंदराव घाटगे आयटीआय येथे बैठक झाली. प्रस्तावित महामार्गामुळे अनेक शेतकरी अल्पभूधारक होतील. अस्मानी संकटांमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांवर हा वरवंटाच आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन करणाऱ्या या महामार्गाला तीव्र विरोध करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. या अन्यायाविरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
गोकुळचे संचालक अंबरीशसिंह घाटगे म्हणाले, ‘शक्तिपीठ महामार्ग झाल्यास परिसरातील शेकडो एकर जमीन जाणार आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा हा मार्ग कशासाठी? हा महामार्ग रद्द होण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकऱ्यांसह आपण सर्वांनी तीव्र लढा उभारण्याची गरज आहे.’
राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील म्हणाले, ‘कागल-निढोरी राज्यमार्ग, दूधगंगा धरण व उजवा कालवा यासाठी यापूर्वी शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन शासनाने संपादित केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या जमिनीही शक्तिपीठ महामार्गासाठी जाणार आहेत. शेतकऱ्यांना कंगाल करणाऱ्या या महामार्गाविरोधात एकसंध लढा उभारूया.’
यावेळी युवराज कोईगडे, युवराज पाटील (बामणी), दादा पाटील (सिद्धनेर्ली), शिवाजी मगदूम, सुधीर पाटोळे (एकोंडी), मल्हारी पाटील(एकोंडी), बाळू पवार, प्रकाश वाडकर, सागर पाटील (व्हनाळी) यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस योगेश कुळवमोडे, विष्णू वैराट, बाळू लोंढे, साताप्पा लोंढे, सागर बाबर,सुरेश लोंढे, निवृती वैराट, प्रकाश लोंढे, नानासो धनगर तसेच बामणी, सिद्धनेर्ली, एकोंडी, व्हनाळी आदी पंचक्रोशीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway
Why are Sangli farmers opposing the Shaktipeeth Highway?
Satej Patil Supports Farmers in Sangli
Shaktipeeth Highway Protest satej patil raju shetti
Marathi News Esakal
www.esakal.com