स्वर्गीय मंडलिकांच्या रक्ता रक्तामध्ये संघर्ष आहे : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हमिदवाडा कारखान्यावर ९वा स्मृतीदिन साजरा

स्वर्गीय मंडलिकांच्या रक्ता रक्तामध्ये संघर्ष आहे : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हमिदवाडा कारखान्यावर ९वा स्मृतीदिन साजरा

हमिदवाडा : साखर कारखान्यावर सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार संजय मंडलिक, व्यासपीठावर उपस्थित माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर व अन्य मान्यवर (छायाचित्र : जे. के. फोटो सुरुपली)
---
2) हमिदवाडा : मुरगूड येथील स्वर्गीय मंडलिक यांच्या स्मृतिस्थळापासून आणलेल्या ज्योतीचे स्वागत करताना युवा नेते ॲड. वीरेंद्र मंडलिक व कार्यकर्ते.(छायाचित्र : जे. के. फोटो सुरुपली)
...


संघर्ष करून ध्येयाकडे चला
राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे खासदार मंडलिकांना आवाहन : स्मृती दिनी सदाशिवराव मंडलिक यांना अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता.१०: ‘लोकसभा निवडणुकीचे वारे एका बाजूला वाहत आहेत. रोज वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होत आहे. पण, दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या शिकवणीप्रमाणे संघर्षाशिवाय काही मिळत नाही. त्यामुळे खासदार मंडलिक तुमच्या नशिबात संघर्षाशिवाय काही नाही. दिवंगत मंडलिकांच्या रक्तारक्तामध्ये संघर्ष आहे. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारची फिकीर करायची नाही. जनता ज्यावेळी आपल्यासोबत आहे, त्यावेळी कोण आपल्यासोबत आहे, कोण पाठीमागे आहे, याचा विचार करायचा नाही. संघर्ष करून दिवंगत मंडलिकांनी घालून दिलेले ध्येय पुढे घेऊन जायचे,’ असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
हमिदवाडा (ता. कागल) येथील साखर कारखान्यावर सदाशिवराव मंडलिक यांच्या ९ व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक होते. सदाशिवराव मंडलिक यांच्या पुतळ्याचे पूजन यड्रावकर, खासदार मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले. मंडलिक युवा प्रतिष्ठानच्या कार्यकत्यांनी मुरगूड येथील मंडलिक स्मृतिस्थळापासून आणलेल्या ज्योतीचे स्वागत ॲड. वीरेंद्र मंडलिक यांनी केले. यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक बॉबी माने, सचिन मगदूम उपस्थित होते.
खासदार संजय मंडलिक म्हणाले, ‘या लोकसभा निवडणुकीत महायुतीतर्फे उभारण्याचा माझा मानस आहे. सद्य:परिस्थिती पाहून तुमच्यासारखेच माझे मन होत आहे. अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही. आचारसंहिता लागलेली नाही. या सगळ्यांमध्ये बघितले तर कायमपणे आपल्या पाचवीला संघर्ष पुजलेला आहे. दिवंगत मंडलिक यांचा विकासाचा वारसा मला मिळाला. त्याचप्रमाणे संघर्षाचाही वारसा मिळाला आहे की काय असे वाटते. निश्चितपणे महायुतीची उमेदवारी मलाच मिळणार आहे.’
स्वागत प्राचार्य अर्जुन कुंभार यांनी केले. यावेळी भिकाजी मगदूम, रुपाली पाटील, ॲड. वीरेंद्र मंडलिक, सत्यजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास यशोवर्धन मंडलिक, सत्यजित पाटील, शेखर सावंत, डॉ. विजय चौगुले, साताप्‍पा कांबळे, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, आदींसह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com