कणेरी ग्रामस्थांचा व्हनाळीच्या जाधव कुटुंबियांना माणूसकी हात

कणेरी ग्रामस्थांचा व्हनाळीच्या जाधव कुटुंबियांना माणूसकी हात

05216
व्हनाळी : येथील अपघातग्रस्त जाधव कुटुंबीयांना ५९ हजारांचा धनादेश देताना पोलिसपाटील संग्राम पाटील, निशांत पाटील, दिलीप कडवे, विलास कौंदाडे आदी. (छायाचित्र ः जगदीश वाडकर, व्हनाळी)
........
कणेरी ग्रामस्थांनी दिला
जाधव कुटुंबीयांना माणुसकी हात

सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता. २९ : कणेरी (ता. करवीर) येथे वीजपुरवठा सुरू करताना व्हनाळी (ता. कागल) येथील वायरमन यशवंत बाबू जाधव यांचा अपघाती मृत्यू झाला. अपघातग्रस्त जाधव कुटुंबीयांना कणेरी ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘एक हात मदतीचा’ या भावनेतून ग्रामस्थांनी ३७ हजार रुपये, तर गोशिमा संस्था व कोल्हापूर फाउंड्री इंडस्ट्रीज संस्थेकडून प्रत्येकी ११ हजार असा एकूण रुपये ५९ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश जाधव यांच्या घरी त्यांचा मुलगा सौरभकडे सुपूर्द केला.
यावेळी कणेरीचे पोलिसपाटील संग्राम पाटील, सरपंच निशांत पाटील, कॅप्टन वसंतराव कदम, कृष्णा कदम, कृष्णा पाटील तसेच व्हनाळीचे सरपंच दिलीप कडवे, ग्रामसेवक संग्राम खाडे, नामदेव बल्लाळ, पांडुरंग कौंदाडे, नामदेव वाडकर, पोलिसपाटील भगवान पोवार, विलास कौंदाडे, संभाजी जाधव, गोरखनाथ वाडकर उपस्थित होते.
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com