आयुष्य हेच फार मोठे धन

आयुष्य हेच फार मोठे धन

05284
आडी ः येथील संजीवनगिरी मठाच्या वतीने आयोजित प्रवचनास उपस्थित भाविक.
................
आयुष्य हेच फार मोठे धन

परमात्मराज महाराज : श्री दत्त देवस्थान मठाच्यावतीने प्रवचन

सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता. २२ : चांगल्या वाङ्याच्या वाचनाबरोबर चांगले विचार समजून घ्यावेत. यामध्ये माणसाचे हित आहे. सर्व धर्माच्या हितासाठी शाश्वत सत्यविचार समजून घेणे आवश्यक आहे. आयुष्य हेच फार मोठे धन आहे. श्वास चालू आहे तोपर्यंत चांगल्या मार्गाने चालत राहिले राहा, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. आडी (ता. निपाणी) येथील संजीवन गिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने आयोजित प्रवचनात ते बोलत होते.
सकाळी श्री दत्त देवस्थान मठात श्री दत्तगुरू चरणी अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली. परमात्मराज महाराज यांची देवीदास महाराजांच्या हस्ते पाद्यपूजा झाली.
परमात्मराज महाराज म्हणाले,‘शुभचिंतन अतिशय महत्त्वाचे आहे. दुसऱ्याचे शुभचिंतन केल्याने आपलेही शुभ होत असते. वर्षारंभ अनेक प्रकारे होत असतात. व्यक्तिगत पातळीवर जन्मदिन हा नवीन वर्षारंभ मानला जात असतो. आयुष्य हेच फार मोठे धन आहे. श्वास चालू आहे तो पर्यंत चांगल्या मार्गाने चालत राहिले पाहिजे. हिंमत न हरता आयुष्यात पुढे पुढे चालत राहावे.’
यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, खासदार आणासाहेब ज्वोले, माजी आमदार काकासाहेब पाटील, लक्ष्मणराव चिंगळे, नितीन दिंडे, अजित पाटील, प्रसन्नकुमार गुजर यांनी तसेच भाविकांनी शाल. श्रीफळ पुष्पहार अर्पण करून परमात्मराज महाराजांना जन्मदिनाच्या सदिच्छा दिल्या.
कार्यक्रमास आडी, बेनाडी, कोगनोळी, हणबरवाडी, हंचिनाळसह कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातून आलेल्या भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला. पुणे येथील अरुण खोत, शशिकांत खोत, राजू होणगेकर, हंचिनाळचे आप्पासाहेब पाटील यांनी अन्नदान केले.
..............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com