गटर बांधकामप्रश्नी आत्मदहनाचा इशारा

गटर बांधकामप्रश्नी आत्मदहनाचा इशारा

गटर बांधकामप्रश्नी
आत्मदहनाचा इशारा
म्हाकवे, ता. ७ : ग्रामपंचायतीने गटार बांधकाम व चुकीच्या पद्धतीने पाणी निचरा नियोजन केल्याबाबत येथील संजय जयसिंग पाटील यांनी कागल पंचायतीसमोर १० जूनला आत्मदहनाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन कागल पंचायत समितीला दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीने चुकीच्या पद्धतीने गटार बांधकाम केले आहे. सरकारी हद्दीतून पाणी ओढ्यात सोडण्याऐवजी माझ्या गट नंबर ३४७४ मधून बेकायदेशीर रस्ता दाखवून गटारीचे सांडपाणी माझ्या शेतातून ओढ्यात साडले आहे. त्यामुळे माझ्या जमिनीचा पोत बिघडला आहे. तसेच माझ्या विहिरीतील पाणी दूषित होत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊन आर्थिक नुकसान होत आहे. ताबडतोब गटार बांधकाम थांबवावे, असे न केल्यास कागल पंचायतीसमोर १० जूनला आत्मदहन करू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com