

5874
केनवडे : अन्नपूर्णा शुगर कारखाना येथे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त वाहनांना रिफ्लेक्टर लावताना मोटार वाहन निरीक्षक विजय मोरे, रंगराव पाटील,श्रीनिवास कुलकर्णी आदी.
......
अन्नपुर्णा शुगर कारखान्यावर
वाहतुक सुरक्षा सप्ताह साजरा
सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता. ७ : ‘वाहनचालकांनी सावधगिरीबरोबरच सुरक्षित वाहन चालवावे. वाहनांना रिपलेक्टर लावावेत. रात्रीच्यावेळी रस्त्यावर वाहने थांबवू नका. मोठ्या आवाजात टेप रेकॉर्ड लावून ध्वनी प्रदूषण करू नका,’ असे आवाहन मोटार वाहन निरीक्षक विजय मोरे यांनी केले.
केनवडे (ता. कागल) येथील अन्नपूर्णा शुगर कारखान्यावर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष संजय घाटगे होते. विविध उपक्रमांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी कारखान्यावरील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. शेती अधिकारी श्रीनिवास कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सुरक्षा अधिकारी विष्णू पाटील, विजय भादवणकर, कारखान्याचे वाहन विभाग अधिकारी संदीप मांडरेकर उपस्थित होते. कृष्णात कदम यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.