उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्तावाचे आवाहन

उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्तावाचे आवाहन
Published on

उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी
२५ सप्टेंबरपर्यंत प्रस्तावाचे आवाहन
म्हाकवे, ता. १४ : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयातर्फे राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांच्या माध्यमातून जनतेला अधिक चांगल्या व दर्जेदार ग्रंथालयीन सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विविध पुरस्कार दिले जातात. यासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव देण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अर्पणा वाईकर यांनी केले आहे.
राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार’, तर ग्रंथालय चळवळीतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्ते व सेवकांना भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या नावाने ‘उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो.
राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. यासाठी अनुक्रमे एक लाख, ७५ हजार, ४० हजार व २५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन या ग्रंथालयांचा गौरव होणार आहे. याशिवाय राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देण्यात येणार आहे. तसेच राज्यातील प्रत्येक महसूल विभागातील एका उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्त्यास व एका उत्कृष्ट ग्रंथालय सेवकास प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रस्ताव जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे संचालक अशोक गाडेकर यांनीही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com