कोतोलीत साडेचार लाख रोख रक्कमेसह सोळा तोळे सोने दागिने लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोतोलीत  साडेचार लाख  रोख रक्कमेसह  सोळा तोळे सोने दागिने लंपास
कोतोलीत साडेचार लाख रोख रक्कमेसह सोळा तोळे सोने दागिने लंपास

कोतोलीत साडेचार लाख रोख रक्कमेसह सोळा तोळे सोने दागिने लंपास

sakal_logo
By

फोटो
...

कोतोली ः येथील बाजारपेठेतील स्व. आमदार संजयसिंह गायकवाड या पतसंस्थेत चोरी झाली.
...


कोतोलीतील पतसंस्थेत साडेचार लाख
रुपयांसह १६ तोळे दागिन्यांची चोरी

माजगाव, ता. २७ : कोतोली (ता. पन्हाळा) येथील मुख्य बाजारपेठेतील स्व. आमदार संजयसिंह गायकवाड पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयातील साडेचार लाख रुपये रोख रकमेसह सोळा तोळे सोने असा १३ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान ही चोरी झाली. सोमवारी सकाळी संस्थेच्या कर्मचाऱ्या‍ने संस्था उघडल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. संस्थेच्या मागील बाजूच्या शेतवडीमध्ये चोरीच्या वापरासाठी आणलेली गॅस टाकी आढळून आली, तर संस्थेमधील लॉकर चावीच्या सहाय्याने उघडून चोरी करण्यात आल्याचे तपासात आढळून आले. चोरी स्थानिक माहिती असणाऱ्या व्यक्तीकडून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तपासासाठी ठसे तज्ज्ञांना पाचारण करून लॉकरवरील ठसे घेण्यात आले. श्वानाच्या साह्याने तपास करण्याचा प्रयत्न केला; मात्र श्वान परिसरातच घुटमळले. संस्थेचे व्यवस्थापक उत्तम चौगुले यांनी पन्हाळा पोलिसांत चोरीची तक्रार नोंद केली आहे. पन्हाळा पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन चोरीविषयी माहिती घेतली. तसेच अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासकामी मार्गदर्शन केले.
...