कासारी धरणात २१  टक्के पाणीसाठा

कासारी धरणात २१ टक्के पाणीसाठा

03272
गतवर्षीच्या तुलनेत
पाणीसाठा खालावला

‘कासारी’त २१ टक्के पाणीसाठा

माजगाव ता. ५ : शाहूवाडी तालुक्यातील काही गावांना व पन्हाळा तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या कासारी (गेळवडे) या मध्यम प्रकल्पात ५ जूनअखेर २१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणात गतवर्षीच्या तुलनेत ३ टक्के पाणीसाठा कमी आहे. उर्वरित पाच लघु पाटबंधारे प्रकल्पांत सरासरी १३ ते ३१ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाळा लांबला तर भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ नये, म्हणून पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी उपसाबंदी लागू होण्याची शक्यता आहे.
कासारी पाणलोट क्षेत्रात कासारी (गेळवडे) प्रमुख मध्यम प्रकल्पासह पडसाळी, पोंबरे, नांदारी, कुंभवडे व केसरकरवाडी हे लघु पाटबंधारे प्रकल्प येतात. कासारी नदीवर १९७७ मध्ये कासारी या मध्यम जलाशयाच्या कामाला सुरुवात झाली. त्यासाठी ३३.२८ चौरस किलोमीटरच्या पाणलोट क्षेत्रात ७८.५६ दलघमी साठा व्हावा अशा पध्दतीने आखणी केली. गेळवडे, गजापूर गावांचे पुनर्वसन झाल्याने ३८०.३० मी. लांबीचा प्रकल्प साकारला. या मुख्य धरणांची पाणीसाठा क्षमता २.७७ टीएमसी आहे. प्रकल्पामधून शाहूवाडी तालुक्यातील २० गावांना व पन्हाळा तालुक्यातील बहुतांशी म्हणजे ४१ गावांतील ९ हजार ४५८ एकर सिंचन क्षेत्राला हा प्रकल्प जीवनदायी ठरला. उन्हाळ्यात पाणी अडविण्यासाठी नदीवर जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे १४ बंधारे आहेत. गतवर्षी ५ जूनला कासारी धरणात २४ टक्के पाणीसाठा होता. सध्या २१ टक्के आहे.
------------------
चौकट
इतर लघु धरणांतील साठा ः कंसात गतवर्षीची टक्केवारी : पडसाळी (१८ टक्के), पोंबरे (३१ टक्के), नांदारी (१३ टक्के), केसरकरवाडी (२१ टक्के), कुंभवडे (१८ टक्के).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com