प्रत्यक्षात पावसाला सुरुवात झाल्यावरच बंधाऱ्याचे बरगे काढा

प्रत्यक्षात पावसाला सुरुवात झाल्यावरच बंधाऱ्याचे बरगे काढा
Published on

‘पावसाला सुरुवात झाल्यावर
बंधाऱ्याचे बरगे काढा’
माजगाव ः जिल्ह्यातील सर्वच नद्यांवर उन्हाळ्यात पाणी अडविण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. पावसाळ्यात बंधाऱ्याला धोका पोचू नये म्हणून बंधाऱ्याचे बरगे काढले जातात. काहीवेळा प्रत्यक्षात पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच हे बरगे काढले जातात. यामुळे नदीतील पाणी वाहून जाऊन पात्र कोरडे पडते. परिणामी शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असते. पाटबंधारे विभागाने पावसाला सुरुवात झाल्यानंतरच बंधाऱ्याचे बरगे काढावेत; अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दगडू गुरवळ (खोतवाडी) यांनी केली. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. पावसाळ्यात बंधाऱ्यात पालापाचोळा, फांद्या, ओंडकी इतर केरकचरा अडकतो. यामुळे पाण्याचा प्रवाहात बंधारा वाहून जाण्याचा धोका असतो. बंधाऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या सुरवातीला बरगे काढले जातात. काही वेळा पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच पाटबंधारे विभागाकडून बरगे काढले जातात. यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर नदी पात्र जागोजागी कोरडे पडते. परिणामी सिंचनासह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असते. प्रत्यक्षात पावसाला सुरुवात झाल्यावरच बंधाऱ्याचे बरगे काढावेत, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com