माजगाव ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदावर हमरी तुमरी

माजगाव ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदावर हमरी तुमरी
Published on

तंटामुक्त समितीवरून
माजगाव सभेत वाद
सत्ताधारी-विरोधकांत हमरी-तुमरी; विविध विषयावर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
माजगाव, ता. २७ : पन्हाळा तालक्यातील माजगावच्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपद व समितीच्या निवडीवरून सत्ताधारी गट व विरोधक यांच्यामध्ये हमरी तुमरी झाली. स्वातंत्र्य दिनानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने सरपंच पूजा सुतार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन केले होते.
या सभेत नळ पाणीपुरवठा, गावची स्वच्छता, गावातील अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ते, ज्येष्ठांच्या हस्ते ध्वजवंदन, विद्यार्थ्यांना अभ्यासिका, शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना, विविध समित्या स्थापना, सांडपाणी व्यवस्था, अंगणवाडी इमारत आदी विषयावर चर्चा झाली.
माजी सरपंच पोपट पाटील व ॲड. हरिश्‍चंद्र तडाखे यांनी गेली सोळा वर्ष तंटामुक्त समितीचा अध्यक्षपद व समितीची पुनर्रचना का केली नाही? या प्रश्‍नावरून सत्ताधारी गटाला धारेवर धरले. उपसरपंच महेश पाटील यांनी सध्याच्या तंटामुक्ती समितीला ग्रामस्थांचा विरोध नसून यामध्ये बदल करणार नाही, असे सांगताच दोन्ही गटात हमरी- तुमरी होऊन तणाव निर्माण झाला. अखेर तंटामुक्त समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आणि वादावर पडदा पडला. दरम्यान, बदलापूर व शिये येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. बी. टी चौगले, डी. जी. पाटील, गणेश लोखंडे, सचिन पाटील, अमर चौगले, अजित पाटील, संकेत दिंडे, मधू घुंगरे, जगन्नाथ कुंभार यांनी चर्चेत सहभाग घेतला. अहवाल वाचन ग्रामसेवक राजकुमार शिंदे यांनी केले. यावेळी सदस्य ए .के . चौगले, नामदेव कदम, जालंदर कुंभार, पूजा चौगले, राजनंदिनी पाटील, राणी कुंभार, सरिता शिंदे, मनीषा लोखंडे, विलास कांबळे उपस्थित होते.
----------------
कोट
गेली सोळा वर्ष तंटामुक्त समिती अथवा अध्यक्ष बदललेला नाही घटनेनुसार हे बदलणे गरजेचे आहे. या अनुषंगाने आम्ही ग्रामपंचायतकडे अध्यक्ष व समिती बदलण्याची मागणी केली आहे.
- पोपट पाटील, माजी सरपंच, माजगाव
-----------------
ग्रापंचायत निवडणुक होऊन सहा महिने झाले. ग्रामसभेमध्ये तंटामुक्त समितीचा अध्यक्षपदासाठी अर्ज आला असता चर्चा करण्यात आली. त्यामध्ये एक दोन व्यक्तींचा विरोध होता. उर्वरीत सर्वांनी ग्रामसभेत समिती व अध्यक्ष पूर्वीचाच असू दे, अशी मंजुरी दिली. त्यामुळे अध्यक्ष व समिती बदलणार नाही.
- पुजा सुतार, सरपंच माजगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com