

04328
शिंदेवाडीत राजे शिवाजी दूध संस्थेची सभा
माजगाव, ता. २ :शिंदेवाडी (ता. पन्हाळा) येथील राजे शिवाजी सहकारी दूध संस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद राहू गणू जगताप होते. संस्थेला एकूण व्यापारी नफा १ लाख ६५ हजार झाला. गाय दूध गटात प्रथम क्रमांक तानाजी सर्जेराव जगताप, द्वितीय तानाजी भीमराव चोपडे, सरदार रामचंद्र कदम, तृतीय तर म्हैस गटात सुरेखा बाबासो शिंदे , द्वितीय अशोक हिंदुराव कदम , तृतीय अरुण गणपती शिंदे, गाय दूध अनुदानाची ऑनलाईन माहिती अचूक भरून संस्थेस सहकार्य केल्याबद्दल धनश्री चोपडे यांचा सत्कार भीमराव चोपडे यांचे हस्ते झाला. यावेळी संस्थाध्यक्षा सुरेखा शिंदे, पांडुरंग सावंत, अरविंद दळवी, भीमराव चोपडे , राम गोडसे, अरविंद दळवी, बाबासो चौगुले, तानाजी विचारे ,पांडुरंग सावंत, कृष्णा शिंदे, मारुती जगताप, साहिल जगताप उपस्थित होते. अहवाल वाचन सचिव अशोक कदम तर प्रस्तावना संस्थापक बी .जी . शिंदे यांनी केली. अरुण शिंदे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.