खोतवाडीत विठ्ठल रूक्मिणी मंदिराचा वर्धापनदिन
04452
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा
खोतवाडीत वर्धापनदिन
माजगाव, ता. १० ः आंतरराष्र्टीय कृष्णभावनामृत संघ (इस्काॅन) संस्थेतर्फे कृष्णभावनेचा जगभरात प्रचार केला जातो. त्याचाच भाग म्हणून (ता. पन्हाळा) येथे इस्काॅन व वारकरी भक्तांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा तेरावा वर्धापनदिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात केला.
इस्काॅनचे वरिष्ठ रूपविलास दास यांनी प्रवचनातून भगवंतलीला सांगितल्या. पालखीमधून इस्काॅनचे संस्थापकाचार्य स्वामी प्रभूपाद, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांची मिरवणूक काढून पुष्पवृष्टी करण्यात आली. इस्काॅन भक्तांनी दिंडी काढून ‘हरे कृष्ण हरे राम..’ नामाचा गजर केला. बालचमूनी विठ्ठल-रुक्मिणी, श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान, चैतन्य महाप्रभू, नित्यानंद महाप्रभू यांच्या रूपात वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधले. महिलांनी झिम्मा फुगडीचा फेर धरला. राजेश्री पाटील यांनी बालोत्सवाचे सादरीकरण केले. भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. केशव विलास प्रभुजी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाले.
श्रीगोविंद दास, जनक महाराज दास , जगन्नाथ लीला, गोपाल हरी दास, वृजवैभव दास, रामचंद्र प्राण, केंबळेकर प्रभू, डॉ. नीलेश पाटील, अमर रणदिवे , गणेश रणदिवे, भरत गौड, वेदांत खोत, सरदार यादव, अभिजित खोत, अक्षय यादव, दगडू गुरवळ, नीलेश चोरगे, अविनाश रणदिवे, अरुण कुंभार, सर्जेराव खडके, अनिल यादव, संभाजी दिंडे, भरत खोत, धीरज खोत, रामराव सावंत, सौरभ खडके, भैरू रणदिवे, विष्णू खोत यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

