वाघवेत किल्ला स्पर्धेत बहिरेश्वर नगरचा पन्हाळगड प्रथम

वाघवेत किल्ला स्पर्धेत बहिरेश्वर नगरचा पन्हाळगड प्रथम

Published on

बहिरेश्वरनगरचा ‘पन्हाळगड’
वाघवेत किल्ला स्पर्धेत प्रथम
माजगाव, ता. १ ः वाघवे (ता. पन्हाळा) येथे आईसाहेब फौंडेशनच्या वतीने आयोजित ‘मी शिवबाचा मावळा’ किल्ला स्पर्धा झाल्या. यामध्ये ‘मी शिवबाचा मावळा’ किल्ला स्पर्धेत बहिरेश्वरनगरचा कौशल मधुकर पाटील ग्रुपचा ‘पन्हाळगड’ किल्ला प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. आर्यन महादेव पाटील ग्रुपच्या राजगड किल्ल्याने द्वितीय क्रमांक पटकावला. तर समीक्षा संजय सुतार हिच्या कलानिधीगड आणि साक्षी पांडुरंग पाटील हिच्या कुलाबा किल्ल्याने विभागून तृतीय क्रमांक मिळवला. रत्नदीप लक्ष्मण सातपुते आणि प्रतीक पांडुरंग पोवार यांनी बनवलेल्या रोहिडा किल्ल्यास चौथा क्रमांक प्राप्त झाला. त्याचबरोबर सादरीकरणमध्ये साक्षी पाटील - प्रथम , वरद पाटील - द्वितीय आणि वेद जाधव याने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना ४ हजारपासून ५०० रुपयांपर्यंत तसेच शालोपयोगी साहित्यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. दीपक शेलार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. प्रणिती उदय पाटील या चिमुकलीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा तर वरद सतीश पाटील याने शिवचरित्रावर मनोगत व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली. आईसाहेब फौंडेशनचे अध्यक्ष महादेव पाटील, पोलिसपाटील गणेश पोवार, महेश पाटील, संतोष जाधव, सारिका पाटील, सतीश पाटील, संतोष विभूते, संदीप पाटील यांच्यासह शिवभक्त, कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com