

‘यवलूज’ला कृषीपंप चोरांचा धुमाकूळ
शेतकरी हतबल; पोलिसांचा सुस्तपणा
सकाळ वृत्तसेवा
माजगाव, ता. २५ ः यवलूज (ता. पन्हाळा) येथे वर्षभरापासून यवलूज व पोर्ले परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या चोरीच्या घटना वाढत आहेत .या चोऱ्यांमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. याचा छडा लावण्यात पन्हाळा पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
काही दिवसांपूर्वी कासारी नदीकाठच्या यवलूज आणि पोर्ले येथील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या मोडतोडी करून त्यातील तांब्याच्या वायरी, विद्युत केबली यांची चोरी करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा कासारी नदीकाठी यवलूजच्या शिवारातील अनिल जनार्दन आडनाईक, प्रकाश ज्ञानदेव मिसाळ, जयसिंग बापू चौगले, दिलीप आकाराम भोळे, बापूसो हरी आडनाईक व पंडित हरी निकम यांचे कृषीपंप चोरट्यांनी लंपास केले आहेत. सध्या ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे. तसेच मका आणि इतर पिकांना पाणी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, चोरट्यांच्या उपद्रवामुळे उन्हाळ्याच्या सुरवातीलाच पाणीपुरवठा ठप्प होऊन पिके वाळून शेतकऱ्यांच्या मोठे नुकसान होत आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी दहशतीत आहेत. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास करून चोरट्यांना अटक करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे. अन्यथा, पोलिस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
कोट
भोळ्याचा नाळवा येथे माझी विहीर आहे. डिसेंबरमध्ये चोरट्यांनी ५ एचपीचे मोटर चोरून नेली. फेब्रुवारीत नवीन मोटर बसवली. तीही चोरट्यांनी चोरली. त्यामुळे पिके वाळू लागली आहेत. पोलिसांनी त्वरित काही कारवाई केली नाही, तर शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल.
-दिलीप आकाराम भोळे, यवलूज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.