

04694
कासारी धरणात ६५ टक्के साठा
इतर लघु प्रकल्पांमध्येही समाधानकारक
सागर चौगले ः सकाळ वृत्तसेवा
माजगाव, ता. १२ ः शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांना समृद्ध करणाऱ्या कासारी (गेळवडे) मध्यम प्रकल्पासह अन्य पाच लघु प्रकल्पांत १२ मार्च अखेर समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. कासारी धरणात ६५ टक्के म्हणजे १.८१ टीएमसी पाणी असून, उर्वरित प्रकल्पांत सरासरी ६२ ते ७७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कासारी धरणात गतवर्षी पेक्षा तुलनेपक्षा २ टक्के कमी यंदा पाणीसाठा आहे. जूनअखेर शेतीसह व पिण्याच्या पाण्याची समस्या भासणार नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाने माहिती दिली.
कासारी पाणलोट क्षेत्रात कासारी (गेळवडे) मध्यम प्रकल्प प्रमुख धरण आहे. त्याची पाणीसाठा क्षमता २.७७ टीएमसी असून, शाहूवाडीतील २० आणि पन्हाळ्यातील ४१ गावांना या प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. ९ हजार ९५५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. उन्हाळ्यात सिंचनाकरिता कासारी नदीवर कोल्हापूर पद्धतीचे १४ बंधारे बांधले आहेत. या बंधाऱ्यांमुळे शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होते. १२ मार्चअखेर कासारी धरणात ६५.९१ टक्के म्हणजे १.८१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी ६७.७४ टक्के होता.
कासारी नदी पाणलोट क्षेत्रातील सर्वच धरणांत समाधानकारक उपलब्ध आहे. पाटबंधारे विभागाने जूनपर्यंत पुरेल, असे नियोजन केले असून शेतीसह पिण्यासाठी पाणीटंचाईची समस्या भासणार नाही. कासारी नदीवरील या प्रकल्पांनी तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यावर्षी समाधानकारक पाणीसाठा असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
इतर लघु प्रकल्पांतील साठा
पडसाळी : ७६.७३ टक्के,
पोंबरे : ७१ टक्के,
नांदारी : ६२ टक्के,
केसरकरवाडी : ६२ टक्के,
कुंभवडे : ७७ टक्के.
.....चौकट....
...तरीही काटकसरीने वापरा
कासारी मध्यम प्रकल्पामध्ये यावर्षी पावसाळ्यात १०० टक्के (२.७७ टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. प्रकल्पांतर्गत असलेल्या शाहूवाडी तसेच पन्हाळा तालुक्यातील सर्व गावांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी जूनअखेर पुरेल; अशा पद्धतीने पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. तरीही शेतकऱ्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.