गायकवाड हायस्कूल मधील  स्वछतागृहाचे उद्घाटन

गायकवाड हायस्कूल मधील स्वछतागृहाचे उद्घाटन

Published on

गायकवाड हायस्कूलमध्ये
स्वछतागृहाचे उद्घाटन
माजगाव : अंबाई शिक्षण प्रसारक मंडळ माजगाव संचलित संजीवनीदेवी गायकवाड हायस्कूल व पुष्पा जयंतीलाल शहा ज्युनिअर कॉलेज शिंदेवाडी (ता.पन्हाळा) येथील विद्यार्थ्यांना बांधलेल्या नूतन स्वछतागृहाचे उद्घाटन एम्पथी फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. आर. सुन्दरेश्वर यांच्याहस्ते झाले. निवृत्त पोलिस निरीक्षक बी. जी. पाटील यांनी येत्या शैक्षणिक वर्षांपासून शाळेकरिता आदर्श नियमावली बनवून व उत्कृष्ट शिक्षक नेमून शाळा पंचक्रोशीत आदर्श करण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले डॉ. नीलेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जी. डी. पाटील यांच्या हस्ते एम. आर. सुन्दरेश्वर सत्कार झाला. यावेळी फौंडेशनचे व्यवस्थापक दिनेश झोरे, मुख्याध्यापक पोपट पाटील, वंदना पाटील, अमर रणदिवे, पिंटू वडाम, बाजीराव पाटील, सरदार लोखंडे, नम्रता जगताप, ग्रामपंचायत सदस्या मनीषा लोखंडे, धुळपा हजारे, शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com