एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत
Published on

कृषी प्रकल्पासाठी महाडीबीटी
पोर्टलवर अर्जासाठी आवाहन
माजगाव, ता. २४ ः जिल्ह्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२५-२६ साठी २२३.०८ लाख रुपये मंजूर झाले असून, क्षेत्र विस्तार कार्यक्रमांतर्गत १५.६६ लाख रुपये खर्चाची तरतूद केली आहे. अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड, अळिंबी उत्पादन प्रकल्प उभारणी व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हे घटक राबविले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल (mahadbtmahait.gov.in) वर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे. योजनेत विदेशी फळे (ड्रॅगनफ्रुट, स्ट्रॉबेरी, अवॅकॅडो), कंदवर्गीय, कट फ्लॉवर्स, मसाला पिके (हळद, मिरची, आले, काळीमिरी, कोकम) तसेच अळिंबी उत्पादन प्रकल्प उभारणी व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना लागवड व प्रकल्पासाठी ४० टक्के अनुदानाची तरतूद असून, खर्चाच्या मर्यादेनुसार कमाल अनुदान देण्यात येणार आहे.
फुलांसाठी लागवडीसाठी कट फ्लॉवर्सना प्रतिहेक्टर कमाल ५० हजार, कंदवर्गीय फुलांना १ लाख, व सुटी फुलांना २० हजार रुपये अनुदान मिळेल. मसाला पिकांमध्ये बियावर्गीय व कंदवर्गीय पिकांना कमाल २० हजार, तर बहुवर्षीय मसाला पिकांना ४० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. विदेशी फळ लागवडीसाठी ड्रॅगनफ्रुटला कमाल२.७ लाख, स्ट्रॉबेरीला ८० हजार, आणि अवॅकॅडोला ५० हजार रुपये मिळतील.
जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवनासाठी २४ हजार रुपये प्रतिहेक्टर, अळिंबी उत्पादन प्रकल्पांसाठी १२ लाख रुपये, बटन अळिंबी उत्पादनासाठी कंपोस्ट प्रकल्पांना १२ लाख रुपये, आणि कमी खर्चाचे अळिंबी उत्पादन केंद्रासाठी १ लाख रुपये अनुदान दिले जाईल. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरून योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com