यवलूज पोर्ले बंधाऱ्याचे बरगे त्वरित काढा

यवलूज  पोर्ले बंधाऱ्याचे बरगे  त्वरित काढा
Published on

04880

यवलूज-पोर्ले बंधाऱ्याचे बरगे काढा
कासारीचे पाणी पात्राबाहेर; १४ गावांच्या कृषीपंप, पिकांना धोका

सागर चौगले /सकाळ वृत्तसेवा

माजगाव ता. २४ ः यवलूज ते पोर्ले (ता.पन्हाळा) दरम्यान व निटवडे येथे कासारी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्याचे बरगे न काढल्यामुळे बंधाऱ्यावरून नदीची पाणी वाहू लागले आहे. नदीची पातळी कमालीची वाढली असून नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. परिणामी नदीकाठचे कृषी पंपासह पिके पाण्याखाली जाऊन नुकसानीचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचं प्रमाण वाढले तर पूरस्थिती उद्धभवू शकते. तरी पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याचे बरगे त्वरित काढावेत; अशी मागणी चौदा गावांच्या शेतकऱ्यांमधून होत आहे.
उन्हाळ्यात पाणी अडविण्यासाठी निटवडेनजीक कासारी नदीवरील हा शेवटचा बंधारा आहे. या बंधारा पाणलोट क्षेत्रातील यवलूज, पोर्ले, माजगाव, पडळ, सातार्डे, उत्रे ,वाघवें, माळवाडी, शिंदेवाडी खोतवाडी, देवठाणे , आळवे, पिंपळे, गोलीवडे आदी चौदा गावांतील शेतीसह पिण्याच्या पाण्याची गरज भागते. काही दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत . यामुळे नदीला मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे. या बंधाऱ्याचे बरगे न काढल्यामुळे कासारीचे पाणी जलद गतीने ओसरण्यावर बंधाऱ्याचे बरगे अडथळा निर्माण करत आहेत. बंधाऱ्यावरुन पाणी वाहत लागले आहे. यामुळे काही ठिकाणी सखल भागात नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. परिणामी कृषी पंपासह नदीकाठची पिके पाण्याखाली जाऊन नुकसानीची शक्यता आहे.

चौकट
कृषी पंप बुडण्याच्या मार्गावर
नदीकाठी काही ठिकाणी कृषी पंप पाण्यात बुडून नुकसान झाले आहे. बहुतांश कृषी पंप पाण्यात बुडण्याच्या मार्गावर आहेत. पाटबंधारे विभागाने संभाव्य धोका ओळखून बंधाऱ्याचे बरगे त्वरित काढावेत; अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

.....कोट...
दरवर्षी मे अखेर बंधाऱ्याचे बरगे काढले जातात. मात्र यंदा अनपेक्षित मुसळधार मॉन्सूनपूर्व पावसामुळे कमी कालावधीत नदीची पाणी पातळी वाढून बंधारा पाण्याखाली गेला आहे. यामुळे बरगे काढण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. नदीचे पाणी ओसरल्यावर त्वरित बरगे काढण्यात येतील.
- वैजनाथ स्वामी, पन्हाळा शाखा अभियंता पाटबंधारे विभाग

बरगे न काढल्यामुळे कासारी नदीचे पाणी वाढले आहे. यामुळे नदीकाठावरचा कृषी पंप बुडाला आहे तर पिके पाण्याखाली जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाने लवकरच बंधाऱ्याचे बरगे काढावेत.
- शहाजी कांबळे, शेतकरी, माजगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com