Mon, Feb 6, 2023

कोळगाव उपसरपंचपदी प्रमोद पवार यांची बिनविरोध निवड
कोळगाव उपसरपंचपदी प्रमोद पवार यांची बिनविरोध निवड
Published on : 12 January 2023, 3:33 am
01870
कोळगाव उपसरपंचपदी प्रमोद पवार
शाहूवाडी ः कोळगाव (ता. शाहूवाडी) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रमोद पवार यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच मंगल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड बैठक झाली. शाखा अभियंता शिवाजी चौगुले निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून उपस्थित होते. उपसरपंचपदासाठी प्रमोद पवार यांचा एकमेव अर्ज होता. त्यामुळे त्यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली. यावेळी सदस्य विलास पाटील, जगन्नाथ कांबळे, लीला पाटील, छाया कांबळे, सविता भारमल, वैशाली पवार उपस्थित होते. मोहन पवार, सुभाष पाटील, माजी सरपंच आनंदा कांबळे, भिकाजी पाटील, आनंदा भारमल, शामराव पाटील,विकास कांबळे, पोलिसपाटील राजाराम कांबळे, दिनकर पाटील, पांडुरंग पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.