Tue, March 28, 2023

जिल्हा परिषद कर्मचारी क्रिडा स्पर्धेत शाहूवाडी महिला संघ विजयी
जिल्हा परिषद कर्मचारी क्रिडा स्पर्धेत शाहूवाडी महिला संघ विजयी
Published on : 7 February 2023, 3:37 am
01918
शाहूवाडी पं.स. समितीच्या
संघाचे व्हॉलीबॉलमध्ये यश
शाहूवाडी ः कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या कर्मचारी क्रीडा स्पर्धेत येथील पंचायत समितीच्या महिलांच्या व्हॉलीबॉल संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांक राधानगरी तर तृतीय क्रमांक कागलच्या संघाला मिळाला. जिल्हा परिषदेसमोर कागलकर हाऊसच्या मैदानावर स्पर्धा झाल्या. पंचायत समितीच्या विजेत्या संघात आश्विनी पाटील (पर्यवेक्षिका), सुरेखा शिरहट्टी (वरिष्ठ सहाय्यक), माधुरी मोहिते (कनिष्ठ सहाय्यक), रेश्मा खाडे (कनिष्ठ लेखा अधिकारी), कोमल कांबळे (आरोग्यसेविका), रूपाली मस्के, नयन गिरीगोसावी, रूपाली कुंभार, अंकिता गिरीगोसावी (ग्रामसेवक) हे खेळाडू सहभागी झाले.