Mon, March 27, 2023

मलकापूरच्या एन डी पाटील महाविद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
मलकापूरच्या एन डी पाटील महाविद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
Published on : 14 February 2023, 3:21 am
01920
मलकापूर ः येथील एन. डी. पाटील महाविद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना प्राचार्य घोलप.
मलकापूरला यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
मलकापूर ः विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत एनसीसी व जिमखाना यात सहभाग घ्यावा. त्यातून विविध संधी मिळतात, असे प्रतिपादन प्राचार्य टी. एन. घोलप यांनी केले. येथील एन. डी. पाटील महाविद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कारावेळी ते बोलत होते. जिमखानाप्रमुख सुहास वाघ यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. सैन्य भरती झालेला प्रथमेश पाटील, अभिषेक आलेकर, अलोक कळत्रे, प्रणव पारले यांचा तर जीवन खोत याची बेसबॉलसाठी राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याबद्दल सत्कार झाला. एनसीसी प्रमुख प्रमोद नाईक यांनी आभार मानले.