
विशाळाडावर दारू पिणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
विशाळाडावर दारू पिणाऱ्यांवर कारवाई
शाहूवाडी ः विशाळगडावर सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिताना आढळल्याने अस्लम अल्लाबक्ष बळगर (२९) यांच्यावर येथील पोलिसांनी दारूबंदी कायदयाअंतर्गत कारवाई केली. न्यायालयाकडून त्यास २ हजार रूपयांचा दंड व १४ दिवसांची साधी कैद अशी शिक्षा देण्यात आली. बळगर ८ मार्च रोजी गडावर दारू पिताना पोलिसांच्या गस्ती पथकास सापडला होता. गस्ती पथकातील पोलिस उपनिरिक्षक प्रसाद कोळपे,शहाजी भोसले,महेश भारमल यांनी कारवाई केली. ९ मार्चला गडा जाणाऱ्या रस्त्यावर दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल अजय वसंत शिंदे (२३) व अशोक कोंडीबा कांबळे (४६) यांचेवर दुसऱ्या गस्ती पथकातील सुयश पाटील व शिवाजी पाटील यांनी कारवाई केली. न्यायालयाकडून या दोघांना १० हजार रुपयांचा दंड व दंड न भरलेस ६ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. विशाळगडाचे पावित्र्य व पर्यावरणाचे रक्षण करावे. येथे पार्टी आणि हुल्लडबाजी करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे पोलिस निरिक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.