शाहूवाडी महावितरणला १ कोटी ५७ लाख थकबाकी वसुलीचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहूवाडी महावितरणला १ कोटी ५७ लाख थकबाकी वसुलीचे आवाहन
शाहूवाडी महावितरणला १ कोटी ५७ लाख थकबाकी वसुलीचे आवाहन

शाहूवाडी महावितरणला १ कोटी ५७ लाख थकबाकी वसुलीचे आवाहन

sakal_logo
By

शाहूवाडी महावितरणसमोर
दीड कोटीवर वसुलीचे आव्हान
शाहूवाडी,ता. २४ ः आर्थिक वर्षाअखेरीस आठवडयाचा कालावधी राहिला असताना येथील महावितरण कार्यालयापुढे १ कोटी ५७ लाख रुपयांची थकबाकी वसुलीचे आव्हान आहे. थकबाकीदारांना कारवाईच्या नोटीसा पाठवल्या आहेत. कांही गावच्या पाणी योजनांची वीज तोडण्याची मोहीम आज महावितरणने कार्यालयाने राबवली. कारवाईनंतर दुपारी थकबाकीपोटी काहींनी रक्कम भरल्याने वीजजोडणी पूर्ववत केली.
तालुक्यात महावितरणची शाहूवाडी, मलकापूर, भेडसगांव, सरूड, बांबवडे, वारूळ, कापशी अशी विभागीय कार्यालये आहेत. या कार्यालयांकडून घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व कृषी पंपांची वसुली चांगली झाली. नळपाणी योजनांची थकबाकी मोठी आहे. तालुक्यात कृषीपंपाचे ४ हजार ९९५ ग्राहक आहेत. त्यांच्या तिमाही बिलापोटी ३५ लाख मिळतात. त्यापैकी २३ लाख वसूल झाले आहेत. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिकचे ३६ हजार ग्राहक आहेत. त्यांच्याकडून ३ कोटी ४ लाख वसुली मिळते. त्यापैकी २ कोटी ४० लाख वसूल झाले. शासकीय कार्यालये बिलापोटी १७ लाख वसुली होते, ९ लाख वसुली झाली आहे. आठ लाखांची थकबाकी आहे. गावोगावच्या नळपाणी योजनांच्या बिलापोटी १ कोटी मिळतात. त्यापैकी २७ लाखांची वसुली झाली असून ७३ लाखांची थकबाकी आहे. १ कोटी ५७ लाख थकबाकी वसुलीचे महावितरणपुढे आव्हान आहे.

कोट-
थकबाकीदारांना वसुलीबाबत नोटिसा दिल्या आहेत. वीजजोडणी तोडण्याची कारवाई होण्यापूर्वी पैसे भरून सहकार्य करावे. नळपाणी योजनांची थकबाकी अधिक आहे. वसुलीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करणार आहे.
-ए. ए. शामराज, उपअभियंता