मलकापूरमध्ये शालेय साहित्याचे वाटप

मलकापूरमध्ये शालेय साहित्याचे वाटप

Published on

मलकापूरमध्ये शालेय साहित्याचे वाटप
मलकापूर : कोल्हापूर शहर जायंट्स ग्रुप व मलकापूर हायस्कूलमधील १९८५ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे तालुक्यातील डोंगराळ भागात शिकणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. येथील हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही. बी. साठे होते. येथील जिल्हा परिषदेची केंद्रीय प्राथमिक शाळा, कन्या शाळा व हायस्कूलमध्ये परिसरातील मोलमजुरी करणाऱ्या तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुले-मुली शिक्षण घेत आहेत. अशा ५४ विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आले. यावेळी स्कूल कमिटी सदस्य सुधाकर पाटील, उपप्राचार्य डी. वाय. कुराडे, पर्यवेक्षक एस. व्ही. कुंभार, जायंटस् ग्रुप कोल्हापूरचे अध्यक्ष प्रकाश वर्णे, सूर्यकांत पालसांदे, दस्तगीर अत्तार, शंकर कुंभार, शौकत कळेकर आदी उपस्थित होते. एन. के. कोठावळे यांनी सूत्रसंचालन केले. दस्तगीर अत्तार यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.